खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात ; बस मधून होतोय जीवघेणा प्रवास, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कारवाई करणार का?? 'छावा'चे प्रवीण कोल्हे यांचा संतप्त सवाल

Photo source : Google 

श्रीरामपूर ( राजेश बोरुडे ) श्रीरामपूर तालुक्यातील सर्व खासगी शाळेच्या बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसविण्यात येत असून, विद्यार्थ्यांना सीट बेल्ट नसणे, अनेक बसेसचे टेललॅम्प, इंडिकेटर बंद असतात. बहुतांशी स्कुल बसचालक अतिशय वेगाने बस चालवतात. वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. याला जबाबदार कोण? उपप्रादेशिक परिवहन विभाग का शालेय व्यवस्थापन, असा संतप्त सवाल छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कोल्हे पाटील यांनी केला आहे. 

यासंदर्भात उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व बसेसची तपासणी करून दोषींवर दांडात्मक व कायदेशीर कारवाई करावी ; अन्यथा श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशाराही 'छावा'चे प्रवीण कोल्हे यांच्यासह इतरांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिला आहे.

तालुक्यातील सर्व खाजगी शालेच्या बसेसचे फिटनेस तपासणी करावी. प्रत्येक विद्यार्थ्यांची काळजी घेऊन सिटबेल्ट लावणे शाळेला बंधनकारक करावे. सर्व बसेस नियमानुसार चालविण्यात याव्यात. बसेसचे फिटनेस चेकअप करावे असे कोल्हे यांनी म्हंटले आहे. नियम धाब्यावर बसविणाऱ्या खाजगी शालेय बसवर तात्काळ ददंडात्मक कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा 'छावा'चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण कोल्हे यांच्यासह राजाराम शिंदे, विठ्ठल तुवर, गणेश शेवाळे, जमीर शेख, आयाज शेख आदींनी दिला आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post