यावेळी आंदोलकांनी कोशारी हटाव-महाराष्ट्र बचाव, वाचाळवीरांची हकालपट्टी करा यासह विविध घोषणांनी तहसील कार्यालय दणाणून सोडले होते. मा.तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आंदोलनाचे निवेदन स्वीकारले.
यावेळी सातत्याने जाणीवपूर्वक महापुरुषांचा अपमान करून जनतेचे मूलभुत प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी समाजात तेढ निर्माण करणारे महाराष्ट्रद्रोही राज्यपाल भगतसिंग कोशारी व महाराष्ट्र सरकारमधील शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,मंत्री मंगलप्रभात लोढा,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
यावेळी कामगार नेते नागेशभाई सावंत, काँग्रेसचे करण ससाणे, सचिन गुजर,संजय छल्लारे, संविधान बचाव समितीचे अहमदभाई, जहागीरदार, लाल निशाण पक्षाचे कॉ. जीवन सुरूडे, श्रीकृष्ण बडाख, शिवसेनेचे सचिन बडदे, आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवाल, काँग्रेसचे अरुण पाटील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे लकी सेठी, प्रविण शिंदे, आम आदमी पक्षाचे विकास डेंगळे, प्रविण जमधडे, यासीन भाई सय्यद, राजेश बोरुडे, समाजवादी पार्टीचे जोयेब जमादार तसेच अशोक बागुल, जावेद भाई शेख, आशिष शिंदे, लहानु त्रिभुवन,अजय बत्तीसे, अमरप्रितसिंग सेठी, यशवंत देठे, भरत डेगळे, सचिन थोरात, अशोक पटारे, सम्राट माळवडे,सिंधुबाई बनकर,राहुल रणपिसे, आदींसह मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवाडे यांच्यासह मोठा बंदोबस्त होता