पुण्यात होणाऱ्या शालेय विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी नगर जिल्ह्याचे नेतृत्व संत तेरेजा गर्ल्स हायस्कूलकडे


श्रीरामपूर ( गौरव डेंगळे ) : अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा संपन्न झालेल्या १४ वर्ष वयोगटातील मुलीच्या कबड्डी स्पर्धात हरेगाव येथील संत तेरेसा गर्ल्स हायस्कूल संघ विजेता ठरला आहे.

या १४ वर्ष वयोगटातील मुलीनी कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीचे लढतील श्रीगोंदा तालुका तर अंतिम सामन्यात नेवासा तालुका संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. शालेय विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी सदर संघ अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करेल. विजयी संघाचे संत तेरेसा गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती, शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी संघाला क्रीडा शिक्षक नितीन बलराज यांचे मार्गदर्शन लाभले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post