खा. लोखंडेंच्या माध्यमातून शिर्डी लोकसभा मतदार संघात मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्त्यासाठी ७० कोटींचा निधी


श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदार संघातील शेत रस्त्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेतून 70 कोटीचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्या माध्यमातून खासदार श्री.सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असल्याची माहिती बाळासाहेबांची शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुख श्री.राजेंद्र देवकर आणि श्री.कमलाकर कोते यांनी दिली.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील शेत पाणंद रस्त्यांची मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली होती. या परिसरात मोठ्या प्रमाणत दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय  असल्यामुळे व त्यांना शेती उत्पादित माल बाजारपेठत विक्री करण्यासाठी ने - आन करण्यासाठी खराब रस्त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पर्यायाने शेतमालाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता ,, अनेक शेतकऱ्यांनी याबाबतच्या अडचणी खासदार श्री.सदाशिव लोखंडे साहेबांच्या कानी घातल्या होत्या. याकडे खासदार महोदयांनी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व रोजगार हमी मंत्री श्री.संदीपान भुमरे  यांचे लक्ष वेधले व मतदार संघातील 132 रस्त्यासाठी 70 कोटींचा निधी मंजूर करून घेतला.

श्रीरामपूर तालुका 54 गावे 97.5 किमी

नेवासा तालुका 20 गावे 37.5 किमी

राहुरी तालुका 31 गावे 57.5 किमी

संगमनेर तालुका 15 गावे 27.5 किमी

कोपरगाव तालुका 19 गावे 34 किमी

अकोले तालुका 11 गावे 19 किमी

राहाता तालुका 20 गावे 38 किमी

 अशा प्रकारे 170 गावातील 311 किमी शेत पाणंद रस्त्यासाठी 70 कोटीच्या वर निधी उपलब्ध झालेला आहे. याबद्दल शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त करण्यात येऊन अभिनंदन करण्यात येत आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post