बेलापूर बसस्थानकाच्या भिंतीची अज्ञताकडून तोडफोड ; एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर : बसस्थानक कार्यालय अनेक दिवसांपासून बंद, स्वच्छतागृहाच्या मंजुरीला टाळाटाळ


बेलापूर ( प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावातील बसस्थानकाची भिंत अज्ञात इसमाने तोडली असुन संबधीतावर कारवाई करण्याची मागणी बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने एसटी महामंडळाकडे करण्यात आली.  महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवुन गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. मागील अनेक दिवसांपासून बसस्थानक कार्यालय बंद असल्याचे समोर आले आहे.एस महामंडळ प्रशासनान प्रवाशांना सुरक्षा, सोयी पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. अनेक वर्षांपासून महिलांकरिता स्वच्छतागृहाची मागणी असताना महामंडळ प्रशासनाकडून मंजुरी मिळाली नसल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. 'साईकिरण टाइम्स' एस महामंडळाच्या श्रीरामपूर आगाराची वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार आहे.

  • प्रवाशांची सुरक्षा धोक्यात 
  • बसस्थानक कार्यालय अनेक दिवसांपासून बंद
  • स्वच्छतागृहाच्या मंजुरीला आगार प्रशासनाकडून टाळाटाळ 

कायम गजबजलेले असलेल्या बेलापूर बसस्थानकाची मागील बाजुस भिंतीस बसवीलेली खिडकी काही दिवसापूर्वी कुणीतरी तोडली होती. त्यावर काहीच कारवाई न झाल्यावर काल रात्री कुणीतरी खोडसाळपणे भिंतीलाच मोठे भगदाड पाडले. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या कानावर ही बाब घातली. पत्रकार देविदास देसाई यांनी तातडीने आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांच्या कानावर ही बाब घातली. श्रीरामपुर बस स्थानकाचे आगार प्रमुख राकेश शिवदे हे तातडीने बेलापूर येथे आले. त्यांनी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड, पत्रकार देविदास देसाई, दिलीप दायमा यांच्या समवेत संबधीत ठिकाणी भेट दिली. त्यावेळी अज्ञात इसमाने ही भिंत तोडली असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बसस्थानकाचे कार्यालय कित्येक दिवसापासून बंद असल्याचे पत्रकार देसाई यांनी निदर्शनास आणून दिले असता लगेच या ठिकाणी कर्मचारी नियुक्त केला जाईल, असे अश्वासन त्यांनी दिले. तोडलेली भिंत तातडीने पुन्हा पूर्ववत केली जाईल, याकरीता ग्रामपंचायतीने सहकार्य करावे, असे अवाहनही शिवदे यांनी केले. सरपंच व उपसरपंच यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन दिले.

गेल्या कित्येक वर्षापासून या परिसरात महीलाकरीता स्वच्छता गृहाची मागणी असून, निधीची देखील तरतुद केलेली असताना आपल्याकडून मंजुरी मिळाली नसल्याची बाब उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आगार प्रमुख शिवदे यांच्या निदर्शनास आणून दिली असता प्रस्ताव पाठविलेला आहे, मंजुरी मिळताच आपणास कळविण्यात येईल असेही शिवदे यांनी सांगितले. यावेळी स्थानक प्रमुख वसंत लटपट, प्रवासी मित्र प्रतिक बोरावके, सुरक्षा रक्षक प्रकाश मुठे, प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड, विलास कुऱ्हे  आदि उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post