या उपोषणास विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा वाढता पाठींबा मिळत असल्याने संबंधित पोलिस प्रशासनाला दखल घेऊन शहर व तालुक्यातील सर्वच अवैध व्यवसाय बंद करणे भाग पडणार आहे. मात्र, स्थानिक पोलीस प्रशासन याबाबत उदासीनतेची भुमिका बजावताना दिसून येत असल्याने जिल्हा पोलिस प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष घालावे, अशी जनसामान्यांतून मागणी देखील जोर धरु लागली आहे.
शहर व तालुक्यात अवैध गावढी दारु,मटका,जुगार,गुटखा,सोरट,अशी किती तरी अवैध व्यावसायांना अक्षरशः उत आला आहे,केवळ स्थानिक पोलीस प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास येत नाही ही मोठी शोकांतिका आहे.पोलिसांनी जर ठरवलं तर खरोखरच ही सर्व अवैध व्यवसाय बंद होण्यास विलंब लागणार तरी किती? क्षणात ही सर्व अवैध व्यवसाय तात्काळ बंद होतील, मात्र यासाठी पोलिसांनी आपली कर्तव्यदक्षता जपणे गरजेचे असते, जनसामान्यांची भिस्त ही नेहमी पोलिसांवरच आहे व असते,मग का पोलिस प्रशासन याबाबी खंबीर दिसून येत नाही ही देखील मोठी विचार करण्यासारखी बाब आहे, म्हणून जोपर्यंत स्थानिक व जिल्हा पोलिस प्रशासन खंबीर भुमिका घेऊन शहर व तालुक्यातील सर्वच अवैध व्यवसाय बंद करत नाही तोपर्यंत समाजवादी पार्टीच्या वतीने सदरील साखळी उपोषण हे चालुच राहणार आहे असेही जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.