अवैध व्यवसायाविरुद्ध 'समाजवादी'चे उपोषण अखेर चौथ्या दिवशी सुटले; पुन्हा अवैध व्यवसाय चालु दिसल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार- जोएफ जमादार


श्रीरामपूर : श्रीरामपूर शहर आणि तालुक्यात प्रचंड प्रमाणात अवैध व्यवसाय चालू  असून यामुळे गुन्हेगारीचे स्वरुप वाढत आहे, संबंधित पोलिस प्रशासनला वेळोवेळी निवेदने देऊनही काहीच उपयोग होत नसल्याने नाविलाजास्तव समाजवादी पार्टीला साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागला होता,समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी येथील मेनरोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण छेडले होते त्या उपोषणाचा काल चौथा दिवस होता. या उपोषणास लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा मिळाला या उपोषणाची दखल घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनाने सदरील सर्वच अवैध व्यावसायावर कारवाई करण्याची मोहीम राबविल्याने तथा यापुढेही या राबविण्यात येणार असल्याचे लेखी पत्र देऊन आश्वाशित केल्याने आज चौथ्या दिवशी श्री. जमादार यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे.

शहर व तालुक्यात अवैध गावढी दारु,मटका, जुगार, गुटखा, सोरट अशी किती तरी अवैध व्यावसायांना अक्षरशः उत आला यातुन भांडणे,तंटे, दादागीरी, गुन्हेगारी वाढत असल्याने शिवाय व्यासनाच्या आहारी गेल्याने कर्जबाजारी होऊन कित्येक गोर - गरीबांची संसार उघड्यावर पडत असल्याने शहर व परिसरातील सदरील सर्वच अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे यासाठी जोएफ जमादार यांनी साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. श्री.जमादार यांचे विविध नागरी समस्यांप्रश्नी सातत्याने संघर्षाची भुमिका शहरवासियांनी पाहिली आहे,यामागे श्रीरामपूर नगर पालिका घनकचरा ठेकेदार आणि शहरातील अस्वछता याबाबत त्यांनी उपोषण छेडले होते त्यात संबंधित ठेकेदाराने कामात कसुर केला म्हणून त्यास संबंधित नगर पालिका प्रशासनाने ७५ हजारांचा दंड देखील केला होता असे अनेक सामाजाभिमुक कार्य त्यांचे सातत्याने चालु असते. जनसामान्यांच्या प्रश्नी आवाज उठवणारा निर्पेक्ष सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांना ख्याती प्राप्त आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post