बेलापूर रोड परिसरात मध्यान्ह भोजन योजनेस प्रारंभ


श्रीरामपूर : केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने ई-श्रम कार्ड आणि बांधकाम मजूरांसाठी मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ गोरगरीबांनी घ्यावा, असे आवाहन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

शहरातील बेलापूर रोड नाका, रासकरनगर, गायकवाड वस्ती, पूर्णवादनगर परिसरात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या मार्फत बांधकाम कामगारांसाठी दोन वेळच्या मध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी श्री.मुरकुटे बोलत होते. याप्रसंगी कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजनेची माहिती, ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया व कामगारांसाठी असलेल्या सुमारे तीस प्रकारच्या लाभाच्या योजनेची सविस्तर माहिती कामगार नेते गणेश छल्लारे यांनी दिली.

यावेळी कारेगाव भाग कंपनीचे संचालक भगवान सोनवणे, बेलापूर सोसायटीचे व्हा.चेअरमन पंडीतराव बोंबले, खोकरचे उपसरपंच दिपक काळे, विजय कुर्‍हे, माजी ग्रा.पं. सदस्य नितीन खंडागळे, डॅनियल साळवे, अंतोन अमोलीक, राधू पठारे, संदीप डावखर, ताराचंद गायकवाड, रोहित साळवे, संदेश दिवे, साहिद शेख, अनिल कोरे, सोमनाथ दुशिंग, केवल दिवे, सचिन फुलपगार, विकी जावळे, गणेश तेलोरे, विजय चौथमल आदी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post