श्रीरामपूर : श्रद्धा वालकर या हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून आफताब या मुस्लिम तरुणाने तिची दिल्ली येथे नेऊन थंड डोक्याने निर्घुण हत्या केली व तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून मेहरौलीच्या जंगलात फेकले. हत्या करून अनेक दिवस फ्रिजमध्ये शरीराचे तुकडे ठेवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार रागाच्या भरात घडलेला नसून ठरवून थंड डोक्याने केला आहे. या प्रकरणी खुनी आफताबला अटक होऊन पोलीस तपास सुरू असला, तरी या प्रकरणाचा समाज म्हणून सरकारने पूर्ण विचार करावा. श्रद्धाचा खुनी आफताब यावर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून अफताब सह या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी 'छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान'च्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली. यासंदर्भात श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक गवळी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन बाकलीवाल, अध्यक्ष विशाल अंभोरे, पंकज ललवाणी, गणेश यमे, डॉ. खैरनार, ऑड. राजेश्वर भारस्कर , विजय खेडकर, रोहन दिवे, रोहन चावरिया, किरण जगताप, मनोज शिरके, शक्तीसिंग सिंग, भावेश शेजवळ, विशाल बाचल आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हंटले आहे कि, लव जिहादच्या माध्यमातून हिंदू मुलींना गुंतवून दिल्ली येथे श्रद्धा सारखे हत्याचे प्रकरण अनेक ठिकाणी होत आहे, हे थांबले पाहिजे. हा आता केवळ एक अपवादात्मक प्रकार राहिला नसून देशभरात असे हजारो प्रकार नियमितपणे उघडकीस येत आहेत. हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून, त्यासाठी अनेक वेळा स्वतःची ओळख लपवून, हिंदू नाव घेऊन मुस्लिम युवकांकडून होणारा लव्ह जिहादचा प्रकार ही समाजाच्या दृष्टीने अत्यंत धोक्याची गोष्ट आहे. केरळ, दिल्लीसह अनेक ठिकाणच्या न्यायालयांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. सक्तीचे धर्मांतरण आणि त्याद्वारे निर्माण केले जाणारे लोकसंख्येचे असंतुलन या मुद्द्यांवरून मा. सर्वोच्च न्यायालयाने मुद्धा नुकतेच सरकारला प्रश्न विचारले आहेत. मात्र, दुर्दैवाने यापूर्वी घडलेल्या अशाच काही घटनांमध्ये हिंदू समाजातील तक्रारदार व्यक्तींनाच पोलिसांकडून उलट त्रास आणि दबाव सहन करावा लागला आहे. समाजाच्या सांविधानिक वर्तणुकीच्या दृष्टीने ही अतिशय निराशाजनक आणि गंभीर बाब आहे.
मुस्लिम समाजाकडून होत असणारे हे प्रकार देशातील सामाजिक सलोखा बिघडवणारे आहेत. अशा प्रकारच्या घटना घडण्याचा परिणाम म्हणून स्वाभाविकरीत्या हिंदू समाजाकडूनही काही प्रतिक्रिया येऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी खरे तर मुस्लिम समाजाकडून पुढाकार घेतला जाण्याची आवश्यकता आहे. पण हे होताना दिसत नसल्यामुळे प्रशासन आणि सरकारने अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करावी. सामाजिक सद्भाव आणि कायदा-सुव्यवस्था टिकवणे ही समाजातील सर्वच घटकांची जबाबदारी आहे. यापैकी जर एखाद्याही घटकाने आपली जबाबदारी नीट पार पाडली नाही, तर हा सद्भाव य कायदा-सुव्यवस्था बिषडू शकतात. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.