रेल्वे स्थानकासमोरील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा स्मारक परिसरात संविधान गौरवदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे शहराध्यक्ष मारूती बिंगले, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कडुस्कर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी देविदास चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, सतीश सौदागर, शहर सरचिटणीस अजित बाबेल, शहर। उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब अहिरे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रूपेश हरकल, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष साजिद शेख, विशाल अंभोरे, राजू धामोणे, गणेश अहिरे पप्पू कूरहे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिलिंदकुमार साळवे यांनी भारतीय राज्य घटनेची माहिती विशद करताना या संविधानामुळेच आपला देश एकसंघ असल्याचे सांगितले. आतापर्यंत भारतीय संविधानाविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी हा दिवस देश पातळीवर संविधान गौरव, सन्मान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून देशभरात भारतीयांमध्ये आपल्या संविधानाप्रती जागरूकता होत आहे. संविधान दिन ते महापरिनिर्वाण दिन असे २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत समता पर्व साजरे करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे साळवे यांनी याप्रसंगी सांगितले. प्रारंभी मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वीरजवान, पोलीस, निष्पाप नागरिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.