देशाला एकसंघ ठेवण्याची ताकद संविधानातच; प्राचार्य निंबळकर


श्रीरामपूर : संविधान म्हणजे आपल्या देशाची राज्यघटना होय. या राज्यघटनेवरच भारतीय लोकशाहीची पायाभरणी मजबूत झाली आहे. भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. राज्यघटनेमुळे आपल्याला अधिकार व कर्तव्य मिळाले आहेत. मिळालेल्या अधिकार व कर्तव्याचा उपयोग स्वतःसाठी व समाजासाठी करा. राज्यघटनेने आपल्याला जे स्वातंत्र दिले आहे ते अबाधित राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांने संविधानाचा अभ्यास केला पाहिजे. विविध जाती धर्म पंथ असलेल्या आपल्या देशाला एकसंघ ठेवण्याची केवळ ताकद संविधानातच आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुहास निंबळकर यांनी केले.  रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररूप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना या विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान दिन समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी भारतीय संविधानाची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब बावके, प्रा.सचिन कुलकर्णी, विवेक मोरे उपस्थित होते.  प्रा.विवेक मोरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. डॉ.आंबेडकर व घटना मसुदा समितीच्या सदस्यांनी भारतातील विविधता लक्षात घेऊन संविधानाची निर्मिती केली. संविधानाची योग्य अंमलबजावणी झाल्यामुळेच आपल्या देशामध्ये लोकशाही मजबूत झाली आहे. लोकशाही मजबूत असल्यामुळे आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करीत आहे असे सांगितले.  या कार्यक्रमाचे प्रस्ताविक व पाहुण्यांचे स्वागत डॉ. सादिक सय्यद यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा.विजय नागपुरे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बापूसाहेब घोडके यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post