श्रीरामपूर : भारतीय संविधान दिन व आम आदमी पार्टीचा वर्धापनानिमित्त आप'चे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व हनुमान मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
श्रीरामपूर शहरामध्ये धुळीचे साम्राज्य पसरलेले असताना नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन आम आदमी पार्टीच्या वतीने श्रीरामपूर शहरातील मुख्य रस्त्यांवरची धुळीची विल्हेवाट लावण्याची विनंती केलेली असूनही शहरातील वाढत्या रस्त्यावरील माती धुळीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वारंवार सांगून देखील फक्त काम केल्याचा दिखावा करत नगरपालिका प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही केली जात नसल्याचे लक्षात आल्याने आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर आम आम आदमी पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत श्रीरामपूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ आणि हनुमान मंदिर परिसरात समोरील रस्त्यालगत रस्त्यालगतची स्वच्छता करून तेथील माती, डिव्हायडर मधला कचरा, उचलून त्या ठिकाणी पाणी मारून स्वच्छता केली. या पुढील काळात आम आदमी पार्टीच्या वतीने श्रीरामपुरात स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असा विश्वास यावेळी जिल्हाध्यक्ष डुंगरवाल यांनी व्यक्त केला.यापुढे नगरपालिका प्रशासनाने शहरातील धूळ व कचरा व्यवस्थापनाच्या कामाकडे बारकाईने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन छेडून प्रशासनाला जाग आणण्याचे काम हाती घ्यावी लागेल असा इशारा यावेळी विकास डेंगळे व प्रवीण जमदाडे यांनी दिला.
त्यानंतर संविधान दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले यावेळी जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे ,भरत डेंगळे, जिल्हा प्रवक्ते एडवोकेट प्रवीण जमधडे, मार्गदर्शक श्रीधर कराळे, युवा चे अक्षय कुमावत ,यशवंत जेठे, विकी लोंढे, प्रशांत बागुल, दीपक परदेशी, बी एम पवार, विजय बारसे , दिलीप उबाळे ,राहुल लुक्कड, डॉक्टर प्रवीण राठोड, डॉक्टर सचिन थोरात,सलीम शेख, भैरव शेठ मोरे आदी उपस्थित होते