श्रीरामपूर : सध्या जिल्ह्यासह राज्यात गायी व म्हशींमध्ये 'लम्पी' आजाराचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. श्रीरामपूर शहरामध्ये ठिकठिकाणी फिरणाऱ्या गायांमध्ये 'लम्पी' आजाराचे लक्षणे आढळून आलेले असल्याने या सर्व जाणवरांचे प्रशासनामार्फत लसीकरण करावे व येणाऱ्या काळातील लम्पीसारख्या आजारापासून गौमातेचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.
यावेळी भायूमो शहराध्यक्ष रुपेश हरकल यांनी शहरामधील फिरणाऱ्या लम्पी आजारापासून त्रस्त असणाऱ्या गोमतांचे छायाचित्रे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या निदर्शनात आणून दिले. त्यावेळी तहसीलदारांनी तात्काळ निवेदनाची दखल घेऊन पशुधन विकास अधिकारी डॉ. कोते यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला व मुख्याधिकाऱ्यांनाही तात्काळ लक्ष देण्याबाबत सूचना केली.
यावेळेस भाजयुमो शहराध्यक्ष रुपेश हरकल, आरंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश ओझा, जिल्हा सचिव राहुल आठवल, सुबोध शेवतेकर, ता.उपाध्यक्ष लखन उपाध्ये, अक्षय धुमाळ, रुद्रप्रताप कुलकर्णी, विशाल रुपनर, उपाध्यक्ष किरण रक्ते, सचिव पंकज करमासे, सुजित तनपुरे, महेश बिरदौडे, प्रथमेश जोशी, कुणाल आठवल, आदी पदाधिकारी उपस्थित होते.