यानंतर साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर म्हणाले , करण व दिपाली ससाणे यांनी महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला असून , महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्यास कुटुंबाचा आर्थिक दर्जा उंचावल्या शिवाय राहणार नाही . यानंतर मा नगराध्यक्ष यांनी संजय फंड यांनी ससाणे यांच्या कार्याचे कौतुक केले . यानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस सौ दिपालीताई ससाणे म्हणाल्या , महिलांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी महिला आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या पाहिजे. बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदत मिळून ,वेगवेगळ्या व्यवसायासाठी त्यांना निश्चितच फायदा होणार आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनीही ससाणे दाम्पत्याच्या कार्याचे कौतुक केले. सदर बचत गटाच्या कार्यक्रम प्रसंगी मा. नगरसेवक रितेश रोटे, सुहास परदेसी, मनोज लबडे, सौ. आशाताई रासकर, प्रवीण नवले, संजय गोसावी, गणेश काते, गोपाल भोसले, राजेश जोंधळे, प्रताप गुजर, श्रेयस रोटे, तीर्थराज नवले, प्रशांत आल्हाट, जिल्हा बँकेचे अधिकारी खर्डे साहेब, पटारे साहेब, जगधने साहेब व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सूत्रसंचालन अजय धाकतोडे यांनी केले.