श्रीरामपूर : बाळासाहेबाची शिवसेना एकनाथ शिंदे गटाची उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. शिर्डी येथे खा. सदाशिव लोखंडे यांनी या निवडी जाहीर केल्या. जिल्हा प्रमुखपदी राजेंद्र देवकर यांची निवड करण्यात आली.
राजेंद्र देवकर यांच्याकडे उत्तर नगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच यावेळी संपर्कपदी बाजीराव दराडे व बाळासाहेब पवार तर जिल्हा संघटकपदी विजय काळे व विठ्ठल घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली. तर श्रीरामपूर तालुका प्रमुखपदी बापूसाहेब शेरकर तर शहर अध्यक्षपदी सुधौर वायखिंडे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व कार्यकल्पांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिर्डी येथे पार पडलेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या.