श्रीरामपूर : महाराष्ट्र सरकारच्या ० ते २० पटाच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला असून, शासनाच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
प्रॉटान'चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संजय धाबर्डे, महासचिव रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष. आर एम धनवडे यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी 'भीमगर्जना' संघटनेचे संस्थापक फिरोजभाई पठाण, सामाजिक कार्यकर्ते राजेश बोरुडे, संजय जाधव आदी उपस्थित होते.
राज्यातील ३६ जिल्ह्यातील ३५८ तालुक्यात एकाच वेळेस चार चारणामध्ये संविधानिक मार्गाने आंदोलन सुरु करण्यात आले आहे. पहिल्या चारणात ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी निवेदन देणे, दुसऱ्या चरणात १२ नोव्हेंबरला धरणे आंदोलन करणे, तिसऱ्या चरणात ३ डिसेंबरला साखळी उपोषण व चौथ्या चरणात १६ डिसेंबर २०२२ जिल्हास्तरीय रॅली काढण्यात येणार आहे.