श्रीरामपूर :कोणत्याही शालेय मुलासाठी दिवाळीची सुट्टी ही मनोरंजनाची मेजवानी असते. यापैकी बहुतांश मुले या सुट्टीत विविध ठिकाणच्या भटकंतींना पसंती देतात, तर काही मात्र स्वत:च्या आवडीच्या खेळात अधिक परिपूर्ण होण्यासाठी क्रीडा शिबिरांमध्ये दाखल होतात. दिवाळीची सुट्टी सुरू होणार असल्याने यंदादेखील अनेक संस्था मुलांना विविध खेळांवर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
मागील दोन वर्षापासून शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित झालेल्या नाहीत आणि या वर्षी त्या नोव्हेंबर,डिसेंबर मध्ये आयोजित होणार आहेत. यासाठी श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे दिनांक २० ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर दरम्यान रोलबॉल,व्हॉलीबॉल,बास्केटबॉल क्रिकेट व स्केटिंग या खेळाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी हे शिबिर खूपच महत्त्वाचा आहे कारण दिवाळीच्या सुट्टीनंतर लगेचच शालेय स्पर्धेला सुरुवात होणार आहे तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन शिबिराचे आयोजक श्री नितीन गायधने यांनी केले आहे. शिबिराची वेळ सकाळी ७:३० ते १०:०० असेल. शिबिराच्या नाव नोंदणीसाठी श्री नितीन बलराज,श्री नितीन गायधने,श्री दौलतराव पवार आदींची संपर्क साधावा.