ब्रेकिंग | प्रवरा पात्रात पुलावरुन उडी मारुन एकाची आत्महत्या


बेलापुर  ( प्रतिनिधी ) बेलापुर खुर्द येथील तरुणाने प्रवरा नदीवरील पुलावरुन उडी टाकुनआत्महत्या केली असुन परिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्याकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

                                 सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान बेलापुर खुर्द येथील एका तरुणाने प्रवरा नदीवरील पुलावरुन उडी घेवुन आत्महत्या केली घटनेची माहीती मिळताच पोलीस हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक गणेश भिंगारदे हरीष पानसंबळ आदिंनी ताताडीने प्रवरा पुलावर जावुन एकलहरे बेलापुर खटकाळी बेलापुर खुर्द येथील पोहणाऱ्या युवकांना बोलावुन नंदी पात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु सर्वत्र शोध घेवुनही त्याचा शोध लागला नाही प्रवरा नदी पात्रात पाणी जोरात वहात असल्यामुळे तो खाली वहात गेला की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे प्रवरा नदी पात्रात उडी मारणारा तरुण हा राजेंद्र बारहाते असल्याची नागरीकात चर्चा सुरु असुन राजेंद्र हा तरुण त्याच्या घरीही आढळून आला नाही त्यामुळे शंका व्यक्त केलु जात आहे बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके हे तपास करत असुन अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबविले असुन सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात येणार आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post