राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पुणे विभाग मुला-मुलींचा संघ घोषित ; श्रीरामपूरच्या खुशी यादवला मुलींच्या संघात स्थान


श्रीरामपूर : शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी आत्मा मालिक क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय व विभागीय १८ वर्षाखालील मुला-मुलींची व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सकाळच्या सत्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यासाठीची निवड चाचणी पार पडली. या निवड चाचणी स्पर्धेसाठी कोपरगाव, लोणी, राहता, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, संगमनेर आदी ठिकाणाहून ६० मुला-मुलींनी सहभाग नोंदवला होता तर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेनंतर पुणे विभागीय निवड चाचणी स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा,पुणे जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातून ३५ मुले तर २१ मुलींनी सहभाग घेतला होता.

सदर विभागीय निवड चाचणीतून वरोरा,अमरावती येथे होणाऱ्या १८ वर्षाखालील मुला-मुलींच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे विभाग संघाची घोषणा करण्यात आली. मुलांचा कर्णधार म्हणून पुण्याचा साईराज बांदल तर मुलींच्या कर्णधार म्हणून नेवासा (नगर)ची रक्षा खेनवार यांची निवड करण्यात आली.मुलांच्या प्रशिक्षकपदी शैलेंद्र त्रिपाठी तर मुलींच्या प्रशिक्षकपदी पापा शेख यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पुणे विभागीय सचिव दादासाहेब तुपे यांनी दिली. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघाला आत्मा मालिक ध्यानपीठ कोकनठाणचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, राजेंद्र कोहकडे,दादासाहेब तुपे, सुनील चोळके,शैलेंद्र त्रिपाठी,शिवाजी जाधव,कुलदीप कोंडे,पापा शेख,शंभूराजे मनोर नितीन बलराज,नितीन गायधने आदींनी शुभेच्छा दिल्या.

निवड झालेला पुणे विभाग मुला मुलींचा संघ पुढीलप्रमाणे

मुलेसाईराज बांदल, विवेक तांबे,सूरज कांदे,दीपराज घोरपडे, रौनक भिसे, सूरज पवार, अनंस शेख, राकेश पवार, अफन खान, प्रणव साळुंके, उमंग आहेर व ऋषीकेश चव्हाण.

मुली: रक्षा खेनवार, ऋतुजा खुंभार, तनुश्री बिडेला, निराळी मंडल, प्रणिता रोडे, रुजुल मोरे, वेदिका शिंदे, श्रुती देशमुख, तन्मयी देशमुख, रोशनी रहासे, भूमिका वासावे व खुशी यादव.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post