केमीस्ट अँंड ड्रगीस्ट असोसिएशनच्या संचालकपदी चायल यांच्यासह सर्व संचालक बिनविरोध


बेलापूर ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुका केमीस्ट अँंड ड्रगीस्ट असोसिएशनच्या संचालकपदी बेलापुर येथील सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे लिंक फार्माचे कैलास चायल यांची बिनविरोध निवड झाली आहे.

बेलापूर येथील साई इंग्लीश मिडीयम स्कूलचे चेअरमन बेलापुर साई मंदिराचे अध्यक्ष व लिंक फार्माचे कैलास चायल यांची सन २०२२- २५या वर्षाकरीता संचालक मंडळाच्या निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. यात श्रीरामपूर शहरातुन बारा व ग्रामिण भागातुन तीन संचालकांची निवड करण्यात आली. सर्व पंधरा संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

आयोध्येत होत असलेल्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेवगीरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास याचे बेलापुरात आगमन झाले असता चायल यांनी स्वामी गोवींद देवगीरीजी महाराजांचे दर्शन घेतले. या वेळी स्वामींनी चायल यांना आशिर्वाद दिले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

यात ग्रामीण भागातुन बेलापुर येथील कैलास चायल, टाकळीभान येथील अथर्व टुपके तर दत्तनगर येथील सुजीत राऊत यांचा बिनविरोध संचालकात समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनोज राठी यांंनी काम पाहीले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post