यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य शंकर चितळकर म्हणाले की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकरी तसेच गोरगरीबांना दिवाळी सणाचा आनंद लुटता यावा या करीता शंभर रुपयात चार वस्तु देण्याचा निर्णय घेतला असुन शासनाचा हा निर्णय खरोखरच सर्वसामान्यांना वाढत्या महागाईच्या काळात नक्कीच दिलासा देणारा आहे अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झालेल्या शेतकऱ्यांना ऐन सणासुदीच्या अर्थात दिवाळीच्या काळात भाजपा सरकारने या गोरगरीब जनतेला मोठा मदतीचा हात दिलेला आहे या वेळी सरपंच निखील वडीतके उपसरपंच गोविंद तांबे आण्णासाहेब गेठे आदिंनी मनोगत व्याक्त केले या वेळी ग्रामसेवक संदीप बडाख अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई गंगाराम भोसले शहाजी वडीतके बबनराव सोपान चितळकर साहेबराव चितळकर गोकुळ पवार विजय काबुडके आण्णासाहेब ढोणे पांडुरंग पटांगरे बाबासाहेब शेंडे ज्ञानेश्वर वडीतके शिवाजीराजे वडीतके विष्णू सोनवणे आदींसह तांबे वाडी तसेच मांडवे येथील रेशनकार्ड धारक महिला आणि लाभार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.
श्रीरामपूर : शासनाने गोरगरीबांना दिवाळी भेट देताना शंभर रुपयात साखर, रवा, हरबरा डाळ व पामतेल या चार वस्तूचा आनंदाचा शिधा वस्तुंचे वाटप श्रीरामपुर तालुक्यात सुरु झाले असुन ग्रामीण भागातही वाटप सुरु झाले आहे .मांडवे तालुका श्रीरामपुर येथे या किटचे वाटप सुरु करण्यात आले.