दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर ‘अशोक’च्या माध्यमातून १२ कोटी श्रीरामपूरच्या बाजारपेठेत


श्रीरामपूर : अशोक उद्योग समुहाचे सूत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील अशोक कारखाना व्यवस्थापनाने दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर ऊस पेमेंटची उर्वरित एफ.आर.पी. ची रक्कम, सभासद ठेवीवरील व्याज, ऊस उत्पादन घट अनुदान, कामगार बोनस आदिची सुमारे १२ कोटी रक्कम सभासद, ऊस उत्पादक व कामगारांना अदा केल्याची माहिती व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे यांनी दिली.

याबाबतचा तपशील देताना श्री.उंडे यांनी सांगीतले की, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अशोक कारखाना व्यवस्थापनाने एफ.आर.पी ची उर्वरीत प्रतिटन ५४ रु.६६ पैसे प्रमाणे रुपये ५ कोटी ९० लाखाची रक्कम अदा करुन एफ.आर.पी प्रमाणे पूर्ण पेमेंट चुकते केले. तसेच १६ एप्रिल ते ३० एप्रिल या काळात गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन रुपये ५०, मे महिन्यात गाळत झालेल्या ऊसास प्रतिटन रुपये १०० तर जून महिन्यात गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन रुपये २०० याप्रमाणे ऊस उत्पादन घट अनुदानाची एकुण रक्कम रु.२ कोटी ३८ लाख अदा केली आहे. सभासदांच्या जमा ठेवीवरील व्याजाची १ कोटी ७ लाख रुपये, कामगारांना १२ टक्के प्रमाणे बोनसची रक्कम २ कोटी ५० लाख अशी एकूण सुमारे १२ कोटीची रक्कम संबंधित सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे यांनी दिली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सदरची रक्कम अदा झाल्याने सभासद, ऊस ऊत्पादक व कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post