या स्पर्धा ज्ञान, शील, एकता हे ब्रीद घेऊन काम करणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद श्रीरामपूर उत्तर नगर जिल्हा यांनी आयोजित केल्या होत्या. जिल्हा संयोजक आदिती जाखडी, प्रथमेश जोशी कार्यक्रम प्रमुख प्रा.अरुण लेले जिल्हाप्रमुख, फुणगेसर यांनी विद्यार्थ्यांचा वैचारिक व्यक्तिमत्व विकास होण्याच्या दृष्टीने या स्पर्धांचे उत्तम संयोजन केले .या पारितोषिक वितरण सोहळ्याचे सुत्रसंचालन बेलापूर महाविद्यालयाची प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी पायल म्हस्के हिने केले.
सिद्धाली नवले व कोमल कांदळकर यांच्या यशाबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव अॅड.शरद सोमाणी, सहसचिव दिपक सिकची, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, भरत साळुंके, रविंद्र खटोड, राजेंद्र सिकची,अॅड.विजय साळुंके,प्रा.हंबीरराव नाईक,सौ.सुविद्या सोमाणी,विश्वस्त बापुसाहेब पुजारी नंदूशेठ खटोड, श्रीवल्लभ राठी, शेखर डावरे,नारायणदास सिकची, हरिश्चंद्र पाटील, श्रीकृष्ण भालेराव,हरिश्चंद्र पाटील महाडिक, सुरेश मुथ्था प्रेमा मुथ्था, लीलावती डावरे,शिक्षक प्रतिनिधी सुनिता ग्रोव्हर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ गुंफा कोकाटे,प्रा.निजाम शेख,प्रा. डॉ बाळासाहेब बाचकर, डॉ.अशोक माने तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थीनी, पालक ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.दोघींच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.