अगस्ती महाविद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते सन्मान


अकोले ( प्रतिनिधी ) : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पर्यावरण रक्षक पंधरवडा निमित्ताने आयोजित चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

       अकोले येथील अगस्ती महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड,आमदार डॉ.राहुल आहेर, माजी आमदार वैभवराव पिचड, महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रभारी रवी अनासपुरे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सरचिटणीस नितीन दिनकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, सरचिटणीस सुप्रिया धुमाळ आदी उपस्थित होते.

       केंद्रीय मंत्री ना. प्रल्हादसिंह पटेल यांनी  महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल कौतुक केले. चित्रकला स्पर्धाविषयी विद्यार्थीकडून माहिती घेऊन त्यांना पण शाबासकी दिली.

      नगर जिल्ह्यात मोठया गटात प्रथम क्रमांक कु. मानशी बाळासाहेब वाडेकर, प्रोत्साहनपर सहभाग स्नेहल जालिंदर घुले  उत्तेजनार्थ सहभाग हर्षदा भाऊसाहेब वाकचौरे, सानिका संदिप देशमुख, गायत्री रामदास घुले यांचा तर लहान गटात प्रोत्साहन पर कु.सई संदिप देशमुख, साक्षी रामदास काळे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

      भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पर्यावरण रक्षक पंधरवडा योजने नुसार महाराष्ट्र राज्य संयोजक व भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, सहसंयोजक प्रवीण अलाई यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्र विभागीय संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, नगर जिल्हा संयोजक विकास गुळवे यांनी या चित्रकला स्पर्धा आयोजित केले होते.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post