आता खड्ड्यांबाबत तक्रारी करा ऑनलाईन, टोल फ्री क्रमांकावर, 'साबां'चे आवाहन


सोलापूर : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गावर खड्डे असतील तर आता सामान्य नागरिकांना ऑनलाईन आणि टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे. www.mahapwd.com यावर 'Citizen' या भागात ‘Pot hole Related Complaints' मध्ये तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय 18002331548 या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी नोंदविण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. 

खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी 18002331548 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. हा दूरध्वनी सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहणार आहे. सामान्य नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर असलेल्या खड्ड्याबाबत काही तक्रार नोंदवायची असल्यास त्यांनी टोल फ्रीवर दूरध्वनी क्रमांकावर नोंदवावी. तक्रार नोंदविताना आपले नाव व दुरध्वनी क्रमांक सुध्दा नोंदवावा. यामुळे आपल्या तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीबद्दल कळविणे शक्य होणार आहे.

शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर खड्ड्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी विभागाने आपले संकेतस्थळ www.mahapwd.com यावर 'Citizen' या भागात ‘Pot hole Related Complaints' मध्ये तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. नागरिकांनी या सुविधेचा उपयोग करुन सार्वजनिक बांधकाम विभागास खड्डेमुक्त रस्ते ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे यांनी केले आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post