श्री.उंडे म्हणाले की, अशोक सहकारी साखर कारखान्याचा सन २0२२-२३ या वर्षीचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने ऑफ सिझनमधील देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करुन हंगाम निर्धारित वेळेत सुरु करण्याची तयारी झाली आहे. कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ दसऱ्याच्या मुहुर्तावर बुधवार दि.५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. कारखान्याचे संचालक श्री.ज्ञानेश्वर काळे व त्यांच्या पत्नी सौ.सोनाली ज्ञानेश्वर काळे तसेच कारखान्याचे डेप्यु. चीफ केमिस्ट श्री.जालिंदर दसपुते व त्यांच्या पत्नी सौ.शीतल जालिंदर दसपुते या दाम्पत्यांचे हस्ते विधीवत पूजन करुन संपन्न होणार आहे.
सदर प्रसंगी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक व हितचिंतक आदिंनी उपस्थित रहावे, असे आवाहन व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, संचालक मंडळाचे सदस्य तसेच कार्यकारी संचालक संतोष देवकर यांनी केले आहे.