रस्त्याच्या कामासाठी मा.आ. मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको


श्रीरामपूर : तालुक्यातील उंदिरगाव-माळेवाडी ते श्रीक्षेत्र सराला बेटापर्यन्तच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु करावे, या मागणीसाठी माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्रीरामपूर-नेवासा मार्गावरील हरेगाव फाटा येथे गुरुवार ता.२७ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १० वा. रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

यासंदर्भात उपविभागीय (महसूल) अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उंदिरगाव-माळेवाडी ते श्रीक्षेत्र सराला बेट या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. हा रस्ता श्रीरामपूरला मराठवाड्याशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याला मोठे खड्डे पडल्याने नागरिक व भाविकांचे हाल होत आहेत. आता पाऊस उघडला असल्याने सदर रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे, या मागणीसाठी गुरुवार (ता.२७) रोजी सकाळी १० वा. वा. माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली हरेगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सदर आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन 'अशोक' चे माजी चेअरमन सुरेश गलांडे, संचालक विरेश गलांडे, कारेगाव भाग कंपनीचे संचालक नारायण बडाख, कचरु औताडे, दिनकर जगताप, रामभाऊ औताडे, राजेंद्र जगताप, राजेन्द्र नाईक, कचरु वाकचौरे, जालिंदर औताडे, शंकर विटेकर आदींसह ग्रामस्थांनी केले आहे.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post