श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्वभागातील भाविकांचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेले श्री क्षेत्र गणेशखिंड येथील ‘वरद गजानन उत्सव सोहळा’, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाची शुक्रवार दि.९ सप्टेबर रोजी सकाळी ९ वा. श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती महंत, गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तनाने सांगता होत आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन विश्वस्त मंडळ, भजनी मंडळ व भाविक भक्तांचेवतीने करण्यात आले आहे.
गेल्या ३८ वर्षापासून दरवर्षी गणेशोत्सव काळात हा सोहळा होत असतो. त्याप्रमाणे यावर्षीही सुरू असलेल्या या ‘वरद गजानन’ उत्सव सोहळ्यास बुधवार दि.३१ ऑगष्ट रोजी मुकूंदराज स्वामी संस्थानचे मठाधिपती महंत किसन महाराज पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, विश्वस्त दत्तात्रय पवार व सौ.विमलबाई पवार आदिंसह मान्यवरांचे हस्ते अभिषेक व धर्मध्वजाचे ध्वजारोहन करत या सोहळ्याचा मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला.
येथे दररोज सकाळी साडेसात वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी एक वा.भजन, दुपारी तीन वा.महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकारांचे जाहीर हरीकिर्तन व सांयकाळी ५ वा. हरीपाठ या प्रमाणे कार्यक्रम सुरू आहेत. परीसरातील वांगी, खिर्डी, चारी क्रं.१२, कारवाडी, पाचेगांव, कारेगांव, मातापूर, खोकर, निपाणीवाडगांव, भोकर व टाकळीभान सह परीसरातील अनेक गावांतील भाविक या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थीत राहतात.
या सोहळ्याची शुक्रवार दि.९ सप्टेबर रोजी सकाळी ९ : ०० वाजता श्रीक्षेत्र देवगडचे मठाधिपती महंत गुरूवर्य भास्करगीरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तनाने सांगता होत आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थीत राहुन लाभ घ्यावा असे आवाहन श्री वरद गजानन देवस्थान ट्रस्ट, गणेशखिंड परीसर, समस्थ ग्रामस्थ, भजनी मंडळ व भाविकभक्तांचेवतीने करण्यात आले आहे.