श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज


श्रीरामपूर : आपल्या पुर्वजांनी पुढच्या पिढीसाठी कार्य केले आहे, त्यांचा वारसा पुढे चालविण्याची गरज आहे.आपल्या विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याचे विभाजन होवून श्रीरामपूर मुख्यालय होण्यासाठी एकत्रीत लढा उभारण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर पाणी प्रश्नासाठी लढाई उभारावी लागणार आहे. आपल्या हक्काच्या पाण्यासाठी समन्यायी पाणी वाटप कायदा दुरूस्ती करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा लागणार आहे, अशा विविध प्रश्नावर राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर पंचायत समीतीचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी व्यक्त केले आहे. 

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील ज्येष्ठ ष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्व. दत्तात्रय मारूती गिरमे सेवा प्रतिष्ठानच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्ताने आयोजीत ‘सन्मान भुमिपुत्रांचा, गौरव रत्नांचा’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक कारखान्याचे माजी संचालक खंडेराव पटारे हे होते. तर डॉ.दिलीप शिरसाठ, चक्रधर महानुभव आश्रमाचे महंत गुंफेकर बाबा,माळवाडगांवचे सरपंच बाबासाहेब चिडे, गिरीधर आसने, अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब विधाटे, आण्णासाहेब चौधरी, भागवतराव पटारे, सुर्यभान शेळके, भाऊसाहेब चव्हाण, दिगंबर झिने, पुंडलीक पटारे, महेश पटारे, मच्छींद्र पटारे, तुकाराम शिंदे, निवृत्ती पटारे, बाबासाहेब साळवे आदि व्यासपिठावर उपस्थीत होते.

स्वातंत्र्य पुर्व काळात संपर्काचे कुठलेही साधन नसताना त्या तरूणांमध्ये खच्चून देशप्रेम भरलेले होते, त्या देशप्रमाच्या जोरावर अनंत अडचणींवर मात करून तत्कालीन स्वातंत्र्यवीर, स्वातंत्र्यांसाठी लढणारे देशप्रेमी, स्वातंत्र्य सैनिक आहे त्या परीस्थीतीवर मात करून लढा दिला म्हणून आज आपण स्वातंत्र्यात आहोत. याची जाणीव आजच्या युवकांना करून देत त्यांच्यात ही देशप्रेम जागृत करण्याची गरज आहे, तालुक्यात आज अनेक भिषण घटना घडत आहेत. समाजाला काळीमा फासणार्‍या या घटना आहेत. यावर समाज जागृत झाला पाहीजे, माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रक्रीया झाली पाहीजे, लोकशाही जीवंत असल्याची जाणीव होईल अशी भावना निर्माण करण्याची गरज असल्याचे यावेळी दीपक पटारे यांनी सांगीतले.

तरूणपिढीने उद्योजक बनले पाहीजे, छोटे छोटे व्यावसाय सुरू करून प्रगती करा, नेहमी सकारात्मक विचार करा, यश नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही. पुरस्कार हे फक्त माध्यम असते परंतू अशा प्रकारच्या पुरस्कारातून संबधीत व्यक्तीला प्रोत्साहान मिळत असते त्यामुळे असे कार्यक्रम झाले पाहीजे असे सरपंच बाबासाहेब चिडे यांनी सांगीतले. तर थोर स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय गिरमे यांचे वर्तन हे नेहमी अध्यात्मीक व सात्वीक वृत्तीचे राहीले आहे. कर्म करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्या प्रमाणे कर्म करत जा परंतु फळाची अपेक्षा करू नका या वृत्तीप्रमाणे त्यांनी आपले जीवन व्यथीत केले असे महंत गुंफेकर बाबा यांनी सांगीतले.

यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य भिमाशंकर शेळके, मच्छींद्र पटारे यांनी मनोगतं व्यक्त केली, स्वातंत्र्य सैनिक कै.दत्तात्रय मारूती गिरमे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व खरेदी विक्री संघाचे संचालक संचीत गिरमे यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन खोकर येथील सौ. दिपाली चव्हाण यांनी केले तर आभार महेश पटारे यांनी मानले. यावेळी समाजातील विविध स्तरातील व्यावसायीक, प्रगतशिल शेतकरी, सरपंच, उत्कृष्ठ कार्य करणारे नोकर, सैनिक, मेडीकल अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी एकनाथ लोखंडे, भाऊराव सुडके, आण्णासाहेब शेळके, गणेश खेडकर, ग्रामविकास अधिकारी प्रदिप ढुमणे, राहुल अभंग, बाळासाहेब पटारे, राजेंद्र तागड, सतीष शेळके, राजेंद्र चौधरी, सुनिल विधाटे, अरूण काळे, सोपान कोल्हे, दिपक शेळके, मच्छींद्र काळे, ज्ञानेश्वर काळे, गोरख डूकरे, सुरेश अमोलीक, रावसाहेब लोखंडे, राजेंद्र विधाटे, ठकसेन खंडागळे, नरहरी नाईक, सलीम पठाण, मोहन गाढे आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post