श्रीरामपूर : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयात मोठ्या जल्लोषात शिक्षकदिन तसेच दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभागातील अल्फिया सय्यद व ख़ुशी केदारे यांनी श्रीकृष्ण व राधाची वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. चार थरांचा मानवी मनोरा रचून केमिकल विभागातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. तसेच इलेक्ट्रॉनिक्स विभागातील विद्यार्थ्यांनी व्दितीय क्रमांक मिळविला. विद्यार्थिनीमध्ये प्रथम क्रमांक इलेक्ट्रॉनिक्स व सिव्हील विभागातील तर व्दितीय क्रमांक कॉम्प्युटर विभातील विद्यार्थिनीनी मिळविला.
या कार्यक्रमाच्यावेळी अध्यक्ष म्हणून अशोक सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भाऊसाहेब उंडे तर प्रमुख अतिथी अशोक कारखान्याच्या तज्ञ संचालिका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, संस्थेचे उपाध्यक्ष योगेश विटनोर, का.सदस्य विरेश गलांडे, संचालक आदिनाथ झुराळे, यांच्या उपस्थितीत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे व राधाकृष्णन यांचे पूजन करण्यात आले. तसेच युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्हे देवून गौरविण्यात आले.
अशोक कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार भानुदास मुरकुटे, संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, सचिव सोपानराव राउत, सहसचिव भास्कर खंडागळे आदिंसह संचालक मंडळ, अधिकारी यांनी विद्यार्थ्याचे कौतुक करून प्राचार्य अंजाबापू शिंदे, विभाग प्रमुख व सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी अध्यक्षीय सूचना प्रा. अरुण कडू यांनी मांडली तर अनुमोदन प्रा. मोहितकुमार गायकवाड व आभार प्रा. सचिन कोळसे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन कल्चरर सेक्रेटरी कु. आकांक्षा शेरकर व जनरल सेक्रेटरी साहिल अमोलिक यांनी केले.