श्रीरामपूर ( गौरव डेंगळे ) : महाराष्ट्र टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनच्या संलग्नता मिळालेल्या अहमदनगर टेनिसबॉल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी श्रीरामपूरचे लकी सेठी तर सचिवपदी नितीन बलराज यांच्या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र टेनिसबॉल असोसिएशनचे सचिव जयंत वासनिक यांच्याकडून मिळाले.
मागील अनेक वर्षापासून श्रीरामपूरच्या क्रीडा वैभवात सेठी व बलराज यांचे कार्य कौतुकास्पद आहे. अहमदनगर टेनिसबॉल असोसिएशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना टेनिसबॉल क्रिकेटमध्ये चांगल्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर आलेली आहे.आगामी काळात श्रीरामपुरात असोसिएशनच्या माध्यमातून राज्य व राष्ट्रीय स्पर्धेचा आयोजन करण्यात येणार आहे.
सेठी यांची अध्यक्षपदी तर बलराज यांची सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र टेनिस बॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजय भगत,उपाध्यक्ष श्री स्वप्निल झुर्मुरे, सचिव जयंत वासनिक यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.