श्रीरामपूर : शहरात मोरया फाउंडेशन व जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ.स्नेहल केतन खोरे यांच्यावतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत अनेक महिलांनी सहभागी होत गौरी गणपतीची आकर्षक सजावट केली. या स्पर्धेचे परीक्षण सौ.दिपल पांडे यांनी करत पारंपारीक सजावटीचा निकाल जाहीर केला.
यावेळी बोलताना स्नेहल खोरे म्हणाल्या की, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम नेहमी राबविले जातात. गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या निमित्ताने महिला भगिनींमध्ये सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक कुटुंबाने अत्यंत आकर्षक सजावट केली असल्याने सर्वोत्कृष्ट क्रमांक काढताना परीक्षकांना तारेवरची कसरत करावी लागल्याचे खोरे यांनी सांगितले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला "मोरया सन्मानचिन्ह" देऊन गौरविण्यात आले. यंदाच्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक सौ.नलिनी विजय नगरकर, द्वितीय पारितोषिक सौ.सीमा प्रसाद कडूस्कर, तृतीय पारितोषिक सौ.साधना रत्नाकर प्रभू यांना मिळाले. यावेळी वर्षा भालेराव, राजश्री होवाळ, श्रद्धा खैरनार आदी उपस्थित होत्या.