श्रीरामपूर : सबंध महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील मतमाऊली यात्रा महोत्सव मोठया उत्साहात संपन्न होत आहे. हरेगावची मतमाऊली लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असल्याचे माजी उपनगराध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी म्हटले आहे.
स्व. जयंतराव ससाणे यांच्या परंपरेनुसार याही वर्षी मतमावली यात्रेकरीता स्व. जयंतराव ससाणे मित्र मंडळ आणि श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमीटीच्या वतीने ११ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. याप्रसंगी मा उपनगराध्यक्ष नामको बँक, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर,श्रीरामपूर जिल्हा दूध संघांचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमोल नाईक, सुनील शिनगारे, प्रकाश ताके,डी. सी. मंडलिक,डी एस गायकवाड,फादर साठे, फादर डॉमिनी, सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके,सुरेश बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.