बेलापूर : पत्रकारितेचा वसा ज्यांनी हयातभर चालविला तीच परंपरा नेटाने पूढे नेण्याचे बाळकडू पुत्र बाळासाहेव व मनोज यांना दिले. अशा स्व. शंकरराव आगे सारखा आणखीन एक कृतीशील पत्रकाराला तालुका मुकला, असे प्रतिपादन पत्रकार विष्णुपंत डावरे व दिलीप दायमा यांनी केले.
स्व. आगे यांच्या गतस्मृतीनां उजाळा देतांना डावरे म्हणाले असतांना स्व. आगे त्यावेळेस ते विठ्ठलप्रभा वृत्तपत्र चालवत होते. मला वृत्तपत्राची आवड असल्यामुळे मी बातम्या पाठवत असे. ते बघून माझे कौतूक करुन मला मार्गदर्शन करीत होते. स्व. तुपे यांच्या आठवणीनां उजाळा देतांना ते म्हणाले स्व.तुपे केवळ जिल्हयाचे नव्हे तर महाराष्ट्राचे भूषण होते. कृशाग्र बुध्दीमत्ता सर्व विषयावरील प्रचंड अभ्यासामुळे यांच्या त्यांच्या पत्रकारितील लिखाणाची पुणे, मुंबई येथील पत्रकार व संपादक प्रशंसा करीत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
यावेळी साहेबराव वाबळे सुधीर नवले,भरत सांळूके,अतिश देसर्डा,दत्ता कुर्हे, शिवाजी पा.वाबळे, चंद्रकांत नाईक,सुधाकर खंडागळे निलेश सातभाई,भास्कर कोळसे. आदिनी स्व. आगे, स्व.तुपे यांच्या तैलचित्रास पुष्पसुमने अर्पण केली.