'छावा'चे राजेश शिंदे यांनी प्रशासनाकडे अनधिकृत वीट भट्ट्याबाबत वारंवार तक्रारी केल्या होत्या. वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाने वीटभट्टीचालकांवर कोणतीही कारवाई केली नसल्याने आज राजेश शिंदे व इतर पदाधिकारी तहसील कार्यालयासमोर सकाळपासून आमरण उपोषणास बसले आहेत. राहाता तालुक्यातील पिंपळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या असून, शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवुन बेकायदेशीरपणे चालू आहे. शेकडो विटभट्या विनापरवाना चालु आहे. या विटभट्या विनापरवाना माती उत्खनन करतात. मोठया प्रमाणात प्रदुषण होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे. वीटभटया सुरु करण्यासाठी शासनाचे नियम व अटी असतात. हे सर्व नियम विटभटया धारकांनी पायदळी तुडविलेले आहे. वीटा तयार झाल्यावर वाहतुक परवाना घेणे आवश्यक असतानाही नको त्या वाहनामध्ये वाहतुक देखील केली जातात. त्यामुळे बरेच अपघात ही झालेले आहे. संबधित वीटभट्टीधारकांवर योग्य ती कारवाई करुन वीटभटया बंद करण्यात याव्यात, असे 'छावा ब्रिगेड'चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले होते.
राहाता : राहाता तालुक्यातील पिंपळवाडी व परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वीटभट्टया राजरोसपणे सुरु आहेत. याबाबत तहसीलदारांकडे वारंवार तक्रारी करून प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. नागरिकांच्या सनदेतील तरतुदीनुसार तहसीलदारांना कारवाई करण्याचे अधिकार असूनही, गेल्या अनेक वर्षापासून सदर विनापरवाना वीटभट्ट्यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याने, सदर बेकायदेशीर वीटभट्ट्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी 'छावा ब्रिगेड सेनेचे' उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजेश शिंदे राहाता तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून (दि.१२) आमरण उपोषणास बसले आहेत.