नीट परीक्षेत कु.मानसी कंत्रोडची उत्तुंग भरारी


शौकतभाई शेख

श्रीरामपूर : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठीचा राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नीट) निकाल बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेमध्ये सेंट झेवियर स्कूलची माजी विद्यार्थिनी कु. मानसी किशोर कंत्रोड हिने एकूण ६७५ गुण मिळवून ई. डब्ल्यू .एस. कॅटेगिरीत देशात ९९ वी तर ओपन कॅटेगिरी मध्ये देशात ११२५ वी आली आहे त्यामुळे तिचा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेज (एम्स) मध्ये तिची निवड होणार आहे.

खाजगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च येतो तर निमशासकीय कॉलेजमध्ये ६० ते ७० लाख रुपये खर्च येत असतो तर राज्यस्तरावर मेडिकल कॉलेजमध्ये सहा ते सात लाख रुपये खर्च होतात परंतु कु. मानसी ला भोपाळ येथील *एम्स्* कॉलेजमध्ये संपूर्ण साडेपाच वर्षाच्या कोर्ससाठी केवळ पाच ते सहा हजार रुपये खर्च येणार आहे. तिच्या या यशामुळे सेंट झेवियर इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य मा. रेव्ह. फा.टायटस थंगराज यांनी तिचा शाळेमध्ये यथोचित सत्कार केला व पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी कु.मानसी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात म्हणाली की, जिद्द, चिकाटी, अभ्यासाचे योग्य नियोजन व आपले ध्येय ठरवले तर यश हमखास मिळतेच,यावेळी तीने आपल्या गुरुजनाबद्दल ही कृतज्ञता व्यक्त केली.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या समन्वयिका सौ. अनिता पाठक यांनी केले व शाळेतील शिक्षक वृंदांनी कु.मानसी ला पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post