श्रीरामपूर प्रभाग ११ मधील पाटाच्या पुलाजवळील खड्ड्यात 'भिमगर्जना'चे वृक्षारोपण


श्रीरामपूर : भिमगर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने शहरातील वार्ड नंबर २ मधील आत्तारीया मस्जिद जवळ पाटाचा कॅनॉल नविन पुलासमोरील रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून या ठिकाणी पाणी साचून व चिखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. मोटार सायकल घसरुन अपघात होत आहेत. शाळकरी मुलांना शाळेत जाताना जीव मुठीत धरून जावा लागते. काही अंतरावर मस्जिद असुन तेथे प्राथना नमाजपठण करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना जाण्यासाठी रस्तापण दूषित झाला असून मोठमोठे दूषित पाण्याचे खड्डे निर्माण झालेले आहे.  अत्यंत निकृष्ट पद्धतीचा रस्ता झालेला असून त्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून तत्काल खड्डे बुजवण्यात यावे, याकरिता भीम गर्जना संघटनेच्या वतीने खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. तत्काल रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास नगरपालिका कार्यालयासमोर उग्र आंदोलन करू, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष फिरोज भाई पठाण यांनी दिला.

 यावेळी श्रीरामपूर शहर युवक अध्यक्ष रफिक पठाण, लखन वैरागर, युसुफ शेख, बबलू  शहा, समीर शहा, रवि धीवर, शाहरुख शेख, दिलीप गडसिंग, अमजद शेख, शाहीद पिंजारी, अमोल वायकर, विजुभाऊ बनकर, मनोज रजपूत आदी उपस्थित होते.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post