श्रीरामपूर (प्रतिनिधी): येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज श्रीरामपूर येथे अहमदनगर जिल्हा रोलबॉल असोसिएशनच्या मान्यतेने तिसरी श्रीरामपूर रोलबॉल लीग स्पर्धा गुरुवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित होणार आहे.या स्पर्धेसाठी मोठ्या गटात ३ संघ तर छोट्या गटात ४ संघाची व कर्णधार यांची घोषणा करण्यात आली.सह्याद्री स्केटर संघाची कर्णधार धनश्री चौधरी, हिमालया स्केटर संघाची कर्णधार वैष्णवी साबदे,विद्यांचल स्केटर संघाची कर्णधार समृद्धी अभंग,निलगिरी स्केटर संघाचा कर्णधार ईशान्य भोसले,गिरनार स्केटर संघाचा कर्णधार सार्थक जाधव,ब्रह्मगिरी स्केटर संघाची कर्णधार हरशीन धूपर तर द्रोणागिरी स्केटर संघाचा कर्णधारपदी राजवर्धन चौधरी यांची निवड करण्यात आल्याची माहिती क्रीडा शिक्षक श्री नितीन गायधने यांनी दिली.
श्रीरामपूर रोल बॉल स्पर्धा श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री रामशेठ टेकावडे तसेच अहमदनगर जिल्हा रोलबॉल असोसिएशनचे सचिव श्री प्रदीप पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित होत आहे.या लीग स्पर्धेत एकूण १६ सामने प्रेक्षकांना बघायला मिळतील.
सर्व स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवण्यात येईल.साखळीतील गुणांच्या आधारे विजेता संघ घोषित करण्यात येईल.प्रत्येक सामना मानकरीला अमृत कृषी सेवा केंद्र श्रीरामपूर यांच्या सौजन्याने सामनावीर पुरस्कार देण्यात येईल.स्पर्धेचे उद्घाटन दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडांगणावर पार पडेल.
निवड झालेले संघ व खेळाडू
- संघ ब्रह्मगिरी स्केटर
- शिवराज पवार,चैतन्य महाले,सोहम दौंड,तन्मय गिरमे,सुजल राऊत,हषीन धुपर,पवित्रा चोथानी व फ्रेया जैन.
- संघ सह्याद्री स्केटर
- धनेश चित्ते,चैतन्य साबदे,अनुज कुऱ्हे,शिवम डावखर,सार्थक गायकवाड,धनश्री चौधरी व सोमय्या झिरमिटे.
- संघ गिरनार स्केटर
- सार्थक जाधव,विक्रांत शेळके,राजवीर पवार,सार्थक रसाळ ,दिया गुलाटी ,दिव्या सोनकांबळे व कुंज करवा
- संघ निलगिरी स्केटर
- ईशान्य भोसले,प्रथमेश दहातोंडे,हर्षदीप धुपर,वरद राऊत,श्रद्धा पवार,सिद्धी राऊत व रक्षा सनी
- संघ विद्यांचल स्केटर
- समृद्धी अभंग,विराज पटारे,अनिश पवार,प्रथमेश जैन,अनिश खैरनार,स्नेहा पवार व ट्विंकल वधवणी
- संघ द्रोणागिरी स्केटर
- युवराज पवार,राजवर्धन चौधरी,केविश जैन,जस्मित गुलाटी,आयुष आगरकर,श्रेया बोरावके व मयुरी ठाणगे
- संघ हिमालया स्केटर
- वैष्णवी साबदे,सिद्धांत गवारे,सार्थक घुले,तनिष खैरनार,सावरी खटाने व वैष्णवी शेळके.