अहमदनगर : शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख श्री राजेंद्र देवकर यांनी काल नगर येथे राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराजे देसाई व खा. सदाशिव लोखडे याच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करून त्यांच्यासोबत काम करण्याच्या निर्णय घेतला असल्याचे देवकर यांनी सांगितले.
याप्रसंगी श्रीरामपूर मधून बापूसाहेब शेरकर, राजेश ताबे,सुभाष लबडे,अशोक जाधव ,संदिप दातीर, राहुल दातीर, संतोष पोखरे, सागर भांड याच्या सह राहता येथील जिल्हा संघटक विजय काळे,नानक सावत्रे,अकोला येथील बाजीराव दराडे ,सुरेश भिसे, नेवासा येथील बाळासाहेब पवार ,शिवाजी चौधरी, गंगावणे,देवळाली शहरप्रमुख सुनिल कराळे, संगमनेर येथील गुलाब भोसले.काळे दिनेश फटागरे यांच्यासह सह अनेकांनी प्रवेश केला. लवकरच अनेक आजी माजी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचेही श्री राजेंद्र देवकर यांनी सांगितले.