बळीराजावर यावर्षी चांगली पिके असताना जास्तीच्या पावसाने पिकांचे नुकसान होऊन पिकांमध्ये पाणी साचले आहे. हे अस्मानी संकट कोसळल्याने बळीराजा हतबल झाला आहे. काही दिवसांवरच दिवाळीचा सण येऊन ठेपला असून या अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. तरी नुकसानग्रस्त पिकांची पंचनामे करून बळीराजा न्याय द्यावा अशी मागणी मा. सभापती डॉ. वंदना ताई मुरकुटे यांनी केली आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते बाबा पोखरकर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, भाऊसाहेब पटारे, सुदाम पटारे, वाल्मीक जाधव,दिलीप पटारे , भाऊसाहेब भोईटे,शिवाजी पवार,लहानु विधाटे, गणेश विधाटे,निखिल कांबळे, गणेश गवारे, प्रेम शेजुळ, बाळू वाकडे, बाळासाहेब लोखंडे,विशाल जाधव, प्रसाद जाधव, योगेश शिंदे कामगार तलाठी अशोक चितळकर भाऊसाहेब,सहा. कृषी अधिकारी रुपाली काळे , योगेश भोईटे, किरण पटारे, आदी उपस्थित होते.