श्रीरामपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती चालणा-या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्त मोरया फाउंडेशन व के.के.आय बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या माध्यमातून महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहरात मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती अहमदनगर जिल्हा नियोजन समिती सदस्या, माजी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी दिली.
सदर शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदू, मधुमेहामुळे पडद्यावर आलेल्या दोषासाठी पडद्याची तपासणी करणे, तिरळेपणावर उपचार, पापणीच्या आजारावरील तपासणी, कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिंग मोफत तपासणी केली जाणार आहे. ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज असेल त्यांचे इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे येथे मोफत जाणे-येणे व सर्व तपासण्या मोफत करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सौ.स्नेहल खोरे यांनी दिली.
सदर शिबीर शनिवार दि.२४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत अंगणवाडी, पूर्णवादनगर, वॉर्ड नंबर ७, श्रीरामपूर येथे होणार आहे. तरी जास्तीत जास्त नारीकांनी नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अहमदनगर जिल्हा नियोजन समिती सदस्या, माजी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी केले आहे.