कु.मर्ज़िया ज़ुल्फिकार शेख यांना एम एस्सीत ९२%


अहमदनगर : येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजचे न्यु.आर्ट कॉमर्स अँड सायन्सची कु.मर्ज़िया जुल्फिकार शेख या विद्यार्थीनीने एम.एस्सी. मध्ये स्टॅटिस्टिक शाखेत ९२% गुण मिळवून नैपुण्य प्राप्त केले आहे, तर काॅलेज मध्ये दुत्तीय क्रमांक पटकावला आहे.

कु.मर्ज़िया शेख हिने बी.पी.एच.ई.अहमदनगर महाविद्यालयातही याच शाखेत बी.एस्सी.मध्ये ९२•५% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला होता. वडील जुल्फिकार शेख यांची शिक्षण व प्रशिक्षण संस्था, टेक्निकल अँड करियर संस्था असुन तेथे वास्तुशास्त्र आरेखक व बांधकाम पर्यवेक्षक हे ट्रेड शिकविले जातात व आई नाज़ेमा शेख ह्या मौलना आज़ाद ऊर्दु हायस्कूल मुकुंदनगर येथे विज्ञानच्या शिक्षिका आहे.

कु.मर्ज़िया शेख हिला प्रा.कुलकर्णी मॅडम,प्रा.थोरवे सर,प्रा.माने सर,प्रा.रोहोकले सर,प्रा.भसमे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. प्राप्त यशाबद्दल अहमदनगर जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, रियाज शेख, प्रसिद्ध ऊर्दु शायर डॉ कासिम इमाम,(मुंबई) सय्यद असिफ अली (मुंबई) हबीब पठाण,सैफ खान, डॉ असिफ शेख नाशिक, जे.यु.सी.अध्यक्ष शेख ईदरीस समता फाऊंडेशन शौकतभाई शेख,इंजि.मोहसिन शेख इत्यादींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post