या कृत्रिम अवयवांची किंमत सर्व सामान्यांना परवडणारी नाही म्हणून सक्षम फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना मोफत वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थी यांनी हे शिबीर झाले म्हणून विशेष आनंद व्यक्त केला व तसेच आपणांस शरीराचा अवयव नसुन देखील आनंदी व धैर्याने जीवन जगत आहात त्यामुळे समाजाचा आपण खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे, असे सक्षम फाऊंडेशन सुशील पठारे म्हणाले.
शिबीर यापूर्वी श्रीरामपूर येथे झाले नाही, अशी प्रतिक्रिया दिली असून यावेळी ह्यापग लोयडचे व्यवस्थापकीय संचालक सचीतानंद शर्मा, जून फर्नांडीस, प्रिया फ्रान्सिस, आशिष गर्ग , फ्रीडम ट्रस्टचे डॉ. सुंदर सुब्रमण्यम, रवी अयंगर, लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फा. ज्यो गायकवाड, सेंट झेवियर टेक्निकलचे फा. संपत भोसले, ब्र. ओलीवर, ब्र. सुनील गायकवाड तसेच आयोजक सक्षम फाऊंडेशनचे सुशील पठारे, रितेश एडके, मयूर गायकवाड, निखिलेश पठारे, सुनिता भोसले, शितल माने, दास अमोलिक व विलास पठारे, लोयोला चर्च युथ ग्रुपचे संदीप आढाव, प्रतीक गायकवाड, साविओ फर्नांडिस, प्रणव गायकवाड, वैभव माघडे, सिद्धार्थनगर युथ फाउंडेशनचे बाबासाहेब मिसाळ, अमोलकुमार मिसाळ, विशाल खंडागळे, करण ढोकणे, रोहित मगरे, अमन पठारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी सेंट झवियर टेक्निकलचे मोलाचे सहकार्य लाभले.