श्रीरामपूर | मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर संपन्न; केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याचा खोरेंचा प्रयत्न


श्रीरामपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सुरू असलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्त मोरया फाउंडेशन, के.के.आय बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या माध्यमातून श्रीरामपूर शहरात मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीरात १२३ नागरिकांनी तपासणी केल्याची माहिती अहमदनगर जिल्हा नियोजन समिती सदस्या, माजी नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे यांनी दिली.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष वहाडणे, भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, अशोक बँकेचे संचालक नाना पाटील, नागेश सावंत, तिलक डुंगरवाल, बाळासाहेब ढेरंगे, सुजित राऊत, विराज आंबेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दत्ता जाधव, महेंद्र पटारे, विजय पाटील, राहुल रूपनर, विवेक तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे म्हणाले की, महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहचविणे आमचा उद्देश आहे. ज्येष्ठ समाजसेवक स्व.जनकभाई आशर यांच्यानंतर सातत्याने होणाऱ्या नेत्र तपासणी शिबिरात खंड पडला होता. तोच वसा शहरात पुढे चालविण्याचा आमचा मानस आहे. या शिबिरामध्ये नेत्र तपासणी, मोतीबिंदू, काचबिंदूचे १२३ रुग्ण तपासण्यात आले असून ज्यांना मोतीबिंदू ऑपरेशनची गरज आहे अशा रुग्णांचे पुणे येथे ऑपरेशन करण्यात येणार आहे. त्यांची जाण्या-येण्याची तसेच उपचाराची व्यवस्था मोफत असल्याची माहिती खोरे यांनी दिली.

दर महिन्याला श्रीरामपूर शहरात २४ तारखेला हे शिबीर होणार असून यावेळी भाजप सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडुकुमार शिंदे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपेश हरकल, बुधराणी हॉस्पिटल, पुणेच्या कोडे मॅडम, पटारे मॅडम, अंगणवाडी सेविका लता गायकवाड, सिमा पटारे, रवी लाड, पंकज मांडगे, संतोष गोरे, कुणाल दहीटे, शिवाजी काळे, दत्तात्रय टापसे, अलका राऊत, योगेश ढोकणे, गौड काका, मोरे काका, दळवी काका, सातपुते ताई, नागरे ताई आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post