अहमदनगर | शासकीय तंत्रनिकेतन येथे २३ सप्टेंबर रोजी रोजगार मेळावा


अहमदनगर दि. 20 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकिय तंत्रनिकेतन व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी २३ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता शासकीय तंत्रनिकेतन (Government Polytechnic) बुरुडगांव रोड, अहमदनगर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त  नि. ना. सूर्यवंशी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

            एसएससी/एचएससी उत्तीर्ण, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, सर्व शाखेतील पदवीधारक, जीएनएम/एएनएम, ओटी कोर्स, बीएचएमएस, बीएएमएस, एमबीबीएस ही शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. सदर मेळाव्यामध्ये एकूण १०८२ रिक्त पदे असून जिल्ह्यातील २५ नामांकित उद्योजक व आस्थापना सहभागी होऊन प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत.

            उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर आपली नांव नोदणी करून पात्रतेनुसार उद्योजकाकडे अप्लाय करावे. किंवा https://forms.gle/cWciyZz5R1kzGxwZ7 या लिंकवर रोजगार मेळाव्यासाठी नांव नोंदणी करावी.

            अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक ०२४१-२९९५७३५ किंवा रोजगार मेळावा समन्वयक  तौसिफ सौदागर( मो. नं.९८८१६ ६५१११)  स्वप्नील ठाणगे (मो. नं. ९८२२१८१११४) व श्री. बद्रिनाथ आव्हाड (मो.नं. ९४२०७२५२८०)  यांच्याशी संपर्क साधावा.

            तरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पुर्ण करुन रोजगाराच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही श्री.सुर्यवंशी यांनी केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post