सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत तातडीने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील


मुंबई, दि. 20 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा विभागाच्या संदर्भात सुरु असलेल्या विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतली आहे. मंत्री श्री. पाटील यांनी विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला आणि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत तातडीने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, असे निर्देश दिले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेतच विद्यापीठ प्रशासनाने सोडवल्या पाहिजेत. यासाठी तातडीने नोडल अधिकारी नियुक्त करावा. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेत सुटतील.


 


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post