के.सी.खुराना यांच्या हस्ते शेख ताहेरा बाजी यांना सय्यद नुसरत जिवन गौरव पुरस्कार व पत्रकार आबिद दुल्हेखान यांना आयडिल जनरलिस्ट पुरस्कार, अहमदनगरचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना भगवान फुलसौंदर म्हणाले की, भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा ५ सप्टेंबरला असतो आणि हाच दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सामाजिक,राजकीय,आणि विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील होते आणि त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्याचसोबत त्यांनी भारताचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती अशी दोन्ही पदे भूषविली. राजकीय क्षेत्रात सर्वोच्च पदावर विराजमान होऊनही शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची ओळख डॉ. सर्वपल्ली यांनी जपली. म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. भारतामध्ये सर्वप्रथम सन १९६२ मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने तळागाळातील वंचित लोकांपर्यंत पोहोचवून ताहेरा बाजी सारख्या ज्येष्ठ शिक्षिकांना "डॉ.सय्यद नुसरत जिवन गौरव" पुरस्कार व आबिद दुल्हेखान यांना "आयडिल जनरलिस्ट" पुरस्कार देऊन संगमनेरातच नव्हे तर जिल्ह्यात नेहरू सेंटरने मोठे प्रेरणादायी कार्य केले आहे, असे गौरवोद्गार अहमदनगरचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी अहमदनगर येथे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी काढले.
यावेळी बोलताना पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार रियाज शेख म्हणाले की शिक्षक हा सुशिक्षित समाज घडविणारा दुवा आहे आणि भावी पिढीचा मार्गदर्शक आहे ज्येष्ठ शिक्षिका ताहेरा बाजी यांनी आपल्या आयुष्यात शिक्षणा मार्फत अनेक विद्यार्थ्यांना घडविले जे आज समाजात विविध पदांवर कार्यरत आहेत आणि सा.मखदुम चे संपादक आबिदखान हे पत्रकारिता क्षेत्रात सतत तळमळीने कार्य करीत असतात आणि उर्दू भाषा वाढीसाठी जिल्हाभरात जाऊन शक्य असतील तेवढे उर्दू भाषा प्रसार आणि प्रचाराचे कार्य करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. या दोन्ही व्यक्तींचा सन्मान नेहरू उर्दू सेंटर तर्फे करण्यात आला हे अत्यंत कौतुकस्पद असल्याचेही ते म्हणाले.
पीपल्स हेल्पलाईनचे सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार प्रकाश थोरात यावेळी बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाचे खूप महत्त्व आहे. कारण शिक्षक विद्यार्थ्याचे भविष्य घडवण्याचे काम करतो आणि त्यांना योग्य मार्ग दाखवतो. तो विद्यार्थ्याला चांगल्या आणि अयोग्यची समज शिकवतो. तसेच पत्रकारांनाही समाज जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. समाजात घडणाऱ्या घटना आणि घडामोडी सर्वांच्या समोर आणणे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे महत्वपूर्ण काम पत्रकार नेहमी करत असतो,शिक्षक आणि पत्रकार हे नेहमी सामाजात महत्वाची भुमिका पार पाडतात म्हणून त्यांचा सन्मान करणे देखील एक कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.
प्रास्ताविक जवाहरलाल नेहरू ऊर्दु सेंटर चे अध्यक्ष शेख ईदरीस यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध ऊर्दु शायर के. सी. खुराना यांनी आपल्या विशेष अंदाजाने शेरोशायरी करुन उपस्थितांची मने जिंकली. प्रसिध्द सिने हिस्टोरीयन नंदकिशोर अढाव, न्यू चांद सुलताना ऊर्दु हायस्कूल (कोल्हार ता.राहाता) चे चेअरमन राजमोहमद शेख, उपाध्यक्ष सय्यद असिफ अली, आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिक्षक आणि पत्रकारांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक शेख जुल्फिकार,शेख नईम, तस्किन शेख, शरद दारकुंड आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी आभार सय्यद असिफ अली यांनी मानले.