![]() |
श्रीरामपुरातील हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने शिष्टमंडळ अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनां भेटले .या शिष्टमंडळाचे नेतृत्व मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे, हिंदुत्ववादी नेते सुनील मुथ्या , शिवसेनेचे नेते अरुण पाटील , कामगार नेते नागेश सावंत , नगरसेवक किरण लुणीया , शिवप्रतिष्ठानचे प्रवीण पैठणकर , आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डूंगरवाल , धर्मजागरणचे देविदास चव्हाण , मार्केट कमिटीचे संचालक मनोज हिवराळे , भाजपचे नेते शशिकांत कडुस्कर, टायगर ग्रुपचे बबन जाधव आदींनी केले.
यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने बोलताना सुनील मुथ्या म्हणाले, ठिकठिकाणी असे प्रसंग घडत असून, याला वेळीच पायाबंद घातला गेला पाहिजे. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावायला नको, पोलीस तपासातील त्रुटींचा आरोपींना फायदा मिळता कामा नये. याची दक्षता पोलिसांनी घ्यावी व आरोपीला शिक्षा होईल या दृष्टीने जबाबदारीने तपास व्हावा, अशी मागणी श्री मुथ्था यांनी यावेळी केली.
या शिष्टमंडळ भेटी प्रसंगी बोलताना मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले, श्रीरामपूर पोलीसींग राहिलेले नाही गुंड आणि चोरांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. मुलींना टार्गेट करून संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते लेडीज जिम मध्ये अनेक गैरप्रकार घडत असून बदनामीच्या भीतीने प्रकार पोलिस स्टेशन पर्यंत पोहोचत नाही. काही प्रकारांमध्ये ट्रेनरच आरोपी होऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. या गोष्टीकडे शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांचे लक्ष वेधले.
अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षिका स्वाती भोर यांच्याशी झालेल्या चर्चेत धर्मजागरणचे देविदास चव्हाण, कामगार नेते नागेश सावंत, आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डूंगरवाल, टायगर ग्रुपचे बबन जाधव आदींनी सहभाग घेतला.
या शिष्टमंडळात संजय यादव , गणेश भिसे, सोमनाथ पतंगे, अर्जुन कर्पे, सुरेश सोनवणे, संदीप वाघमारे , सिद्धार्थ साळवे, किशन ताकटे, महेश विश्वकर्मा, रितेश काटे , दिपक देशमुख, शरद थोरात, दीपक देशमुख , सोनू खवले आदीसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.