हरेगाव ( अहमदनगर ) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हरेगाव येथील मत माऊली यात्रेमध्ये फ्लेक्स बोर्ड लावण्यास बंदी असून, आदेशाचे उल्लंघन केल्यास सबंधीतावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात बैठक संपन्न झाली. १० सप्टेंबर रोजी यात्राउत्सव संपन्न होत असल्याने बैठकीमध्ये यात्रेच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. दुकानाचे नियोजन करण्याची जबाबदारी उंदीरगाव ग्रामपंचायत इकडे नेहमीप्रमाणे देण्यात आली. यात्रेकरूंना सुविधा पुरवण्याचे व परिसर स्वच्छता करण्याचे काम उंदीरगाव हरेगाव ग्रामपंचायत माध्यमातून केले जाणार आहे.
बैठकीमध्ये पाणी , वीज ,आरोग्य यासह अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली. बैठकीला श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खाडे , नायब तहसिलदार वाकचौरे , संत तेरेजा चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर सुरेश साठे , प्राचार्य फादर डॉमिनिक रोझारिओ , फादर सचिन मंतोडे , उंदिरगावचे सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके , सुनिल आव्हाड , हरेगावचे सरपंच सौ.ऊषाताई कांबळे, उपसरपंच चेतन त्रिभुवन , पॅरिस कौन्सिलचे सदस्य जो दिवे सर, डी. एस. गायकवाड ,बी .सी मंडलिक, गुलाब , पत्रकार फिलिप पंडित तसेच अमोल नाईक, ग्रा.प.सदस्य दीपक बोधक, उमेश दिवे, सुभाष पंडित , संजय साळवे, दिलीप त्रिभुवन , कामगार तलाठी हेमंत डहाळे , ग्रामसेवक शरद , मंडळ अधिकारी वायखिंडे , एम एस ई बी चे अभियंता साठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे , एसटी महामंडळ , उत्पादन शुल्क , पंचायत समिती विभागाचे प्रतीनिधी उपस्थित होते.आभार संत तेरेजा चर्च काॕन्सिलचे फिलीप पंडीत यांनी मानले.