बेलापूर ( प्रतिनिधी ) येथील जे.टी.एस हायस्कूलच्या सन १९९६-९७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी 'हर घर तिरंगा' अभियानासाठी दोनशे तिरंगा ध्वज ग्रामपंचायतीस सूपूर्त केले.
बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा अभियान राबविले जाणार आहे. सदर अभियनासाठी ग्रमपंचायत मार्फत तिरंगा ध्वज वितरण केले जाणार आहे. या अभियानासाठी सदर माजी विद्यार्थ्यांनी दोनशे तिरंगा ध्वज सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्याकडे सुपूर्त केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, सुधाकर तात्या खंडागळे, पञकार देविदास देसाई, दिलिप दायमा, सुहास शेलार तसेच ग्रुपचे सदस्य राधेश्याम अंबिलवादे, कैलास दळे, विजय पोपळघट, योगेश कोठारी, अजीम सय्यद, अनिल मुंडलिक, मंगेश गवते, शैलेश अमोलिक उपस्थित होते.